जिओ देत आहे ९० दिवसांसाठी अनलिमिटेड ४जी डेटा फुकट

reliance-jio
मुंबई : रिलायन्स जिओने मोबाईल सेवा देणाऱ्या प्रचलित सर्वच कंपन्यांना जोरदार धक्का देत आपले ४जी सिम बाजारात उतरवले आहे. रिलायन्सने ग्राहकांना हे ४जी सिम बाजारात उतरवताना जबरदस्त ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार रिलायन्सचे ४जी सिम घेणाऱ्या ग्राहकांना तब्बल ९० दिवसांचा इंटरनेट डेटा पूर्णपणे फुकट मिळणार आहे.

मार्केटमध्ये उतरण्याची घोषणा रिलायन्सने जिओने केल्यापासून, मोबाईल सेवा पूरवणाऱ्या स्पर्धक कंपन्यांनी सावध पावले टाकायला सुरूवात केली होती. त्यामुळे रिलायन्स जीओचे ४जी सिम कार्ड मार्केटमध्ये यायच्या आधीच अनेक कंपन्यांनी आपले कॉलदर तसेच, इंटरनेट डेटा पॅकचे दरही घटवले होते. आता तर रिलायन्स जिओ प्रत्यक्षातच आपले ४जी सिमकार्ड मार्केटमध्ये उतरवल्यामुळे रिलायन्स जिओ आणि त्यासोबत जून्या आणि प्रचलित मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या यांच्यात तुफान स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

वोडाफोन, आयडीया, एअरटेल, एअरसेल, बीएसएनएल या मोबाईलसेवा देणाऱ्या प्रचलित कंपन्या असून, नव्याने लॉंच झालेल्या रिलायन्स जिओला या कंपन्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. यात बीएसएनएल ही शासकीय कंपनी आहे. तर, इतर सर्व कंपन्या पूर्णपणे खासगी आहेत. तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत असल्याने अत्यंत स्वस्त किमतीत स्मार्टफोन उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यातच स्मार्टफोन आणि इंटरनेट यांचे अगदी घट्ट नाते आहे. हे विचारात घेऊनच ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. याचा ग्राहकांना चांगलाच फायदा होत असून, कंपन्यांच्या या स्पर्धेचा ग्राहक जोरदार लाभ घेत आहेत.

Leave a Comment