सॅमसंगचा अवघ्या ४५९० रुपयात ४जी फोन

samsung
मुंबई : मोबाईल युझर्सना दिग्गज सॅमसंगने मेगा गिफ्ट दिले आहे. अत्याधुनिक ४जी स्मार्टफोन सॅमसंगने लाँच केला असून लाँच केलेल्या झेड २ या स्मार्टफोनची किंमत अवघी ४ हजार ५९० रुपये आहे.

कोरिअन कंपनी तिझेनची ऑपरेटिंग सिस्टिम या फोनमध्ये आहे. तसेच यामध्ये VoLTE व्हिडीओ कॉलिंग सुविधाही आहे. या फोनमध्ये ‘माय मनी ट्रान्सफर’ हे अप मोबाईल बँकिंगचे काम करेल. महत्त्वाचे म्हणजे या अपमुळे तुमच्याकडे जरी डेटा पॅक नसेल, तरीही तुम्ही नेटबँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकाल. हे अप सॅमसंगने भारतात बनवले आहे.

या फोनमध्ये १२ भारतीय भाषा आहेत. याशिवाय हा फोन तुमचा ४० टक्के डेटा वाचवू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे. या फोनमध्ये एस-बाईक सारखे फिचरही उपलब्ध आहे.

हा फोन ४ इंचाचा असून ५मेगापिक्सलचा एलईडी फ्लॅशसह कॅमेरा आहे. या फोनचा प्रोसेसर १.५GHz इतका आहे. ‘सॅमसंग झेड२’ची रॅम १जीबी इतकी आहे. या फोनची मेमरी ८ जीबी इतकी असून ती १२८जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

Leave a Comment