रिलायंस कॅपिटलच्या संचालक मंडळात अनिल अंबानींचा मुलगा

reliance1
नवी दिल्ली – भरपूर दिवस चाललेल्या चर्चेनंतर रिलायन्सचे अनिल अंबानी यांचा मोठा मुलगा जय अनमोल याचा रिलायंस कॅपिटलच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. साल २०१४पासून जय अनमोल हा रिलायंस कॅपिटलच्या विभिन्न क्षेत्रात कार्यरत होता. कंपनी द्वारा प्रसिद्ध केलेल्या पत्रकात रिलायंस ग्रुपचे अनिल अंबानी यांचे जय अनमोल हे एकमेव सदस्य आहेत. पुढील महिन्यात कंपनीच्या होणाऱ्या बैठकीत अनमोल यांच्या कार्यकारी सदस्य म्हणून शिक्कामोर्तब करण्यात येईल.

Leave a Comment