नागपूर होणार विमान निर्माण उद्योगामध्ये जगातील प्रमुख केंद्र

devendra-fadnvis
नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानासाठीच्या निर्माण उद्योगामध्ये जगातील प्रमुख केंद्र म्हणून नागपूर विकसित होत असल्याचे प्रतिपादन केले. टाटा उद्योग समूहाच्या ताल मॅन्युफॅक्चरिंग सोलुशनतर्फे मिहान येथे ड्रीमलायनर ७८७ या बोईंग विमानासाठी निर्माण केलेल्या पाच हजाराव्या फ्लोअर बिमच्या पुरवठा संदर्भातील कन्साईनमेंटचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच विमानासाठी लागणाऱ्या सुटे भाग निर्मिती विभाग जेनेरिक मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.

टाटा उद्योग समूहाच्या ‘ताल’ मॅन्युफॅक्चरिंग सोलुशन उद्योग समूहातर्फे बोईंग विमानासाठी अत्यंत उच्च दर्जाचे फ्लोअर बिम निर्माण करुन मिहानचे नाव जागतिक स्तरावर पोहचविले आहे. बोईंग एमआरओ व ताल उद्योग समूहामुळे विमानासाठी लागणारे सुटे भाग निर्मिती व देखभालीसाठी जगातील प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मिहान येथे एरो स्पेस इको सिस्टिमसाठी जागतिक स्तराच्या आवश्यक सर्व सुविधा निर्माण झाल्या असल्यामुळे टाटा उद्योग समूहाचे तालतर्फे बोईंग ७८७ या विमानासाठी फ्लोअर बिम निर्माण करून नागपूरचे नाव जागतिक स्तरावर पोहचविल्याबद्दल विशेष अभिनेदन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बोईंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांच्या प्रयत्नामुळे एमआरओ नंतर ‘ताल’ सुरू झाले आहे.

Leave a Comment