एसटीच्या रातराणीची प्रवासी संख्या घटली

st
मुंबई : काही दिवसापूर्वीच मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवरील पूल रात्री साडेअकराच्या सुमारास कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बसेस वाहून गेल्या. त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. यातील काही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले असले तरी काहींचे अद्याप बेपत्ताच आहे. या दुर्घटनेमुळे प्रवाशांच्या मनात रात्रीच्या प्रवासाबाबत मोठी भिती निर्माण झाली आहे.

यामुळे एसटीच्या रातराणीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅफिकचा त्रास सतावत नाही. त्यामुळे अनेक जण रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र महाड दुर्घटनेनंतर रात्रीऐवजी दिवसा प्रवासाला प्रवाशांची पसंती मिळत आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नावर याचा परिणाम झाला आहे. प्रवाशांची संख्या निम्म्याने घटल्याने गेल्या १५ दिवसांमध्ये १५ टक्के घट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment