रेनोची १००० सीसीवाली नवी क्विड कार लॉन्च

kwid
नवी दिल्ली : आपली छोटी कार क्वीडचे नवीन व्हर्जन आज फ्रान्सची कार उत्पादक कंपनी रेनोने लॉन्च केले आहे. एक लीटर पेट्रोल इंजन क्षमता असलेली (१०००) सीसी या कारची किंमत ३.९५ लाख रुपये आहे. (ही दिल्लीतील एक्स शो रूमची किंमत आहे)

सध्या ८०० सिसी (०.८) क्षमता असेलली कंपनीची कार २.६४ लाख पासून ३.७३ लाख रुपयांपर्यंत विकली जाते. (दिल्लीतील एक्स शो रूमची) आहे. आता त्यांनी रेनोची १००० सीसी इंजन क्षमता असलेली रेनो क्विड लॉन्च केली आहे. याची किंमत ३.८२ लाख ते ३.९५ लाखांपर्यंत आहे. त्यामुळे ८०० सीसी पेक्षा २२ हजार देऊन १००० सीसी कार घेता येणार आहे.

Leave a Comment