आयबॉलचा नवा व्हॉइस कॉलिंग टॅबलेट

kareena
नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांसाठी नवा व्हॉइस कॉलिंग टॅबलेट भारताची प्रसिद्ध कॉम्प्युटर निर्माता कंपनी आयबॉल लवकरच लाँच करणार असून स्लाईड क्युबोईड हा नवा टॅबलेट लवकरच लाँच करण्यात येणार आहे. अद्याप कंपनीकडून या टॅबलेटच्या किंमत आणि उपलब्धतेविषयी कोणतीही माहिती देण्यात न आल्यामुळे या टॅबलेटचे फिचर्सची माहिती सध्या देण्यात आली आहे.

स्लाईड क्युबोईडमध्ये ८ इंचाचा एचडी डिस्प्ले त्याचबरोबर १.० GHz ARM कोर्टेक्स A५३ ६४bit प्रोसेसर, Mali 400 MP जीपीयू , अँड्राइड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम, २ जीबी रॅम, १६ जीबीची इंटरनल स्टोरेज क्षमता आणि ५ मेगा पिक्सलचा रिअर आणि २ मेगा पिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आल आहे. याची मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यात ४जी LTE नेटवर्कसह WiFi 802.11 bg, WiFi हॉटस्पॉट, WiFi डायरेक्ट, ब्लूटूथ 4.0, माइक्रो USB पोर्ट, GPS/A-GPS आणि FM रेडियो अशा कनेक्टीव्हिटी देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment