पुढील तीन महिन्यांत ‘इस्रो’च्या चार उपग्रहांची गगनभरारी

isro
नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन केंद्राचा (इस्रो) उपग्रह अवकाशात सोडण्याचा धडाका कायम असून, आणखी चार उपग्रह पुढील तीन महिन्यांमध्ये अवकाशात झेपावणार आहेत. ही माहिती इस्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक मिलस्वामी अण्णादुराई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अण्णादुराई म्हणाले, २०१५च्या ऑगस्टपासून २०१६च्या ऑगस्टपर्यंत भारताने दहा उपग्रह अवकाशात सोडले आहेत. आता सप्टेंबरमध्ये इन्सॅट ३ डी आर आणि स्कॅटसॅट-१ हे उपग्रह, तर ऑक्‍टोबरमध्ये जीसॅट-१८ आणि नोव्हेंबरमध्ये रिसोर्ससॅट-२ ए हे उपग्रह सोडले जातील. पुढील तीन वर्षांत ७१ उपग्रह अवकाशात सोडण्याचे इस्रोचे नियोजन असून, त्यानुसार काम सुरू आहे.

Leave a Comment