जाहिरातबाजीवर अॅमेझॉनचा जोर

amazon
मुंबई – अॅमेझॉन कंपनीने फ्लिपकार्टला टेलिव्हिजन आणि प्रिंट माध्यमात खर्च करण्याच्या बाबतीत मागे टाकले असून ई-व्यापारी कंपन्यांच्या एकूण जाहिरात खर्चात अॅमेझॉन टीएएम मीडिया रिसर्चच्यावतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीने प्रथम स्थानी आहेत. २०१६च्या पहिल्या सहा महिन्यात टीव्हीवर जाहिरात देण्याच्याबाबतीत अॅमेझॉन पहिल्या क्रमांकावर आहे.

ही कंपनी गेल्या वर्षी पाचव्या स्थानी होती. प्रिन्ट मीडियामध्येही अॅमेझॉनही अव्वल क्रमांकावर पोहोचली आहे. या माध्यमात जाहिरात देण्याच्या यादीत कंपनी गेल्या वर्षी चौथ्या स्थानी होती. व्हॉईस सेगमेन्टमध्ये कंपनीचा हिस्सा २१ टक्के आहे. २०१५मध्ये हा आकडा ९ टक्के होता. टीव्हीवर जाहिरात करण्याच्या बाबतीत अॅमेझॉन पहिल्या स्थानी, ओएलएक्स दुस-या, फ्लिपकार्ट तिस-या, मिंत्रा चौथ्या, तर स्नॅपडील १०व्या स्थानी आहे.

Leave a Comment