आता प्रत्येक आठवड्यात बोला ९४ तास फुकट

bsnl
नवी दिल्ली – आता बीएसएनएल ग्राहक देशात कोणत्याही मोबाइल किंवा लँडलाइनवर मोफत फोन करू शकतात. त्यांना प्रत्येक आठवड्यात ९४ तास मोफत बोलता येणार आहे. दूरसंचार कंपनी बीएसएनएलने देशात पहिल्यांदा २१ ऑगस्ट पासून प्रत्येक आठवड्यात ९४ तास मोफत बोलण्याची सुविधा दिली आहे. देशभरात कुठेही मोबाइल आणि लँडलाइनवर फोन करून ग्राहक बोलू शकतात.

आतापर्यंत ही सुविधा प्रत्येक दिवशी १० तास अशी मिळत होती. आता शनिवार रात्री ९ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत म्हणजे सलग ९४ तास निःशुल्क कॉल करू शकतात. त्याचप्रमाणे रविवारी चोवीस तास निःशुल्क कॉलिंगची सेवा देखील मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. यावेळी देखील मोफत कॉलिंग सेवा मिळणार आहे. बीएसएनएलच्या महाप्रबंधक दीनदयाल तोषनीवाल यांनी ही संपूर्ण माहिती दिली.

Leave a Comment