उर्जित पटेल यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती

urjit-patel
नवी दिल्ली : आर्थिक जगतात सध्या रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आज गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यासंदर्भात गुरुवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली होती. दरम्यान गव्हर्नर पदाच्या शर्यतीत रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे अर्थशास्त्रज्ञ सुबिर गोकर्ण या दोघांची नाव सध्या आघाडीवर होते. पण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऊर्जित पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

Leave a Comment