आता वर्षभर वापर एकच नेटपॅक !

internet
नवी दिल्ली – दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नव्या ग्राहकांना आकर्षित करणे आणि सध्याच्या ग्राहकांना इंटरनेट वापरास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने नेटपॅकची वैधता ३६५ दिवसांपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे.

सध्या ट्रायच्या नियमानुसार केवळ जास्तीत जास्त ९० दिवसांपर्यंतची वैधता असलेले विविध नेटपॅक्‍स उपलब्ध असल्यामुळे प्रीपेड ग्राहकांना ९० दिवसांतून किमान एकदा रिचार्ज करणे अनिवार्य होते. इंटरनेटचा नियमित वापर करणाऱ्या ग्राहकांना या समस्येला सामोरे जावे लागत होते. या जाचापासून सुटका करण्यासाठी तसेच नवीन ग्राहकांना आकर्षित करून सध्याच्या ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी मोबाईलवरील डेटापॅक्‍सची वैधता जास्तीत जास्त ३६५ दिवसांची करण्यात आली आहे. ही वैधता ट्रायने टेलिकॉम दूरसंचार ग्राहक नियमन कायद्यातील (टीसीपीआर) दहाव्या दुरुस्तीनुसार ३६५ दिवसांपर्यंत करण्यात आली आहे.

Leave a Comment