मुंबई :पोस्टपेड ग्राहकांसाठी व्होडोफोन नवी स्कीम घेऊन आली असून १९९९ रुपयांमध्ये व्होडाफोनच्या ग्राहकांना अनलिमिटेड रोमिंग, अनलिमिटेड कॉलिंग आणि ८ जीबी इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे. १६९९ रुपयांमध्ये ग्राहकांना फ्री रोमिंग आणि अनलिमिटेड कॉलिंगसोबत ६जीबी इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे.
व्होडाफोन देत आहे अनलिमिटेड कॉलिंग आणि रोमिंग
याबरोबरच ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ जीबी ३जी-४जी डेटा, ७०० मिनीटांचे कॉलिंग आणि ५०० एसएमएसचा समावेश आहे. कंपनीने ६९९ आणि ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल केले आहेत.