१४ हजार कर्मचा-यांना नारळ देणार सिस्को सिस्टीम्स

cisco
सॅनफ्रान्सिस्को- आपल्या १४ हजार कर्मचा-यांना सॅनफ्रान्सिस्को स्थित सिस्को सिस्टीम्स कंपनी नोकरीतून कमी करणार आहे. ही कंपनी नेटवर्क उपकरण तयार करणारी असून जागतिक स्तरावरील जवळपास २० टक्के कर्मचारी कमी केले जाणार असल्याचे हे वृत्त सीआरएन या तंत्रज्ञानविषयक संकेतस्थळाने दिले आहे.

कर्मचारी कपातीची घोषणा येत्या काही आठवडय़ात सॅन जोस स्थित कंपनी करेल, अशी अपेक्षा आहे. हार्डवेअरपासून फारकत घेऊन कंपनी आता सॉफ्टवेअर केंद्रित कंपनी होत आहे. सिस्कोशिवाय मायक्रोसॉफ्ट आणि एचपी या दोन कंपन्यांनीही यावर्षी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

मायक्रोसॉफ्टने जुलैमध्ये २८५० कर्मचारी कमी करणार असल्याचे जाहीर केले होते आणि वर्षभरात ही कपात केली जाणार आहे. कंपनीची एकूण कर्मचारी कपात ४,७०० झाली आहे. एचपीने ३,००० कर्मचारी कमी करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, जगभरात ७०,००० कर्मचारी असलेल्या सिस्कोने भाष्य करण्यास नकार दिला आहे.

Leave a Comment