भारतात लाँच झाली आसूसची दमदार झेनफोन सिरीज

asus
नवी दिल्ली- नुकताच झेनफोन ३ ही सिरीज तैवानची कंपनी आसूसने भारतात लाँच केली असून आपल्यासाठी झेनफोन ३, झेनफोन ३ डिलक्स, झेनफोन ३ अल्ट्रा, झेनफोन ३ लेजर या व्हॅरियन्ट्समध्ये फोन उपलब्ध होणार आहे.

झेनफोन ३ ची किंमत २१,९९९ रु., झेनफोन ३ डिलक्स आणि अल्ट्राची किंमत ४९,९९९ रुपये आणि झेनफोन ३ लेजरची किंमत १८,९९९ रुपये आहे. फोनसोबतच आसूसने झेनबुक ३ आणि ट्रान्सफॉर्मर ३ प्रो लॅपटॉप लाँच केले आहेत. त्यांची किंमत १,४४,९९० रुपये आहे. आसूसने ही नवी उत्पादने प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या हस्ते भारतात लाँच केली आहेत.

झेनफोन ३ ची स्क्रीन ५.२ इंच आणि ५.५ इंच आहे. या फोनला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे, १६ मेगा पिक्सल रिअर आणि ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. झेनफोन ३ डिलक्स स्मार्टफोनची स्क्रीन ५.७ इंच आहे. ६ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज आणि २३ मेगापिक्सल कॅमेऱ्यासहित हा फोन बाजारात आला आहे. झेनफोन ३ लेजर ची स्क्रीन ५.५ इंच आहे, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर ४३०, ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज ही या फोनची वैशिष्ट्ये आहेत. झेनफोन बुक ३ ची स्क्रीन १२.५ इंच आहे, इंटेल कोर आय ७ प्रोसेसर, इंटेल एचडी ग्राफिक्स आणि विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम ही या फोनची वैशिष्ट्ये आहे.

Leave a Comment