पर्यटकांसाठी खुला होणार जगातील सर्वात मोठा आणि उंच काचेचा पूल

china
बीजिंग – शनिवारपासून पर्यटकांसाठी जगातील सर्वात मोठा आणि उंच काचेचा पूल खुला करण्यात येणार असून हा ग्लास ब्रिज चीनमधील हुनान प्रांतात आहे.

४३० मीटर लांब, ६ मीटर रुंद असलेला हा पूल एक प्रकारचे स्थापत्यशास्त्रातील चमत्कार असल्याचे म्हटले जात आहे. हा पूल जमिनीपासून सुमारे ३०० मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे. या एकाच पुलाने आतापर्यंत १० विश्वविक्रम तोडले आहेत. एकाच दिवसात ८,००० पर्यटकांना पूल ओलांडण्याची परवानगी असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. हा पूल डिसेंबरमध्येच पूर्ण करण्यात आला होता. परंतु सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या पार पडल्यानंतरच हा पूल सर्वांसाठी खुला होईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले होते.

Leave a Comment