सरकार सुरु करणार ३२ शैक्षणिक वाहिन्या

prakash-javdekar
नवी दिल्ली : लवकरच ३२ शैक्षणिक वाहिन्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी यातील ३ वाहिन्या सुरु करण्यात येणार आहेत.

अंतिम टप्प्यात या संदर्भातील तयारी येवून पोहोचली असून या वाहिन्या आता दुरदर्शनच्या माध्यमातून घरोघरी कशा पोहचवायच्या याची योजना मंत्रालयाकडून आखण्यात येणार आहे. या वाहिन्या घरोघरी पोहचाव्यात म्हणून मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुख्य केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा प्रदान करणा-यांची भेट घेतली, असे वरिष्ठ अधिका-याकडून सांगण्यात आले.

Leave a Comment