महाग झाली टाटाची ‘टियागो’

tata-tiago
नवी दिल्ली – टाटा टियागोच्या किंमतीत टाटा मोटर्सने ५ ते ६ हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली असून टाटा टियागोच्या ३० हजार वाहनांची आतापर्यंत नोंदणी झाली असून बाजारात टाटा टियागो सादर करण्यात आली त्यावेळी त्याची किंमत ३.२ लाख रुपये इतकी होती. दरम्यान बाजारात ही चारचाकी जेव्हा सादर करण्यात आली तेव्हाच तिच्या किंमतीत वाढ करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली गेली होती. साधारणपणे ३ महिन्यानंतर किमतीत बदल केले जातात मात्र आम्ही ५ महिन्यानंतर बदल केले आहेत, असे टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.

Leave a Comment