आर्मी कॅंटीन आहे देशातील सर्वात यशस्वी रिटेल चेन

army-canteen
नवी दिल्ली- बिग बाजार, सेंट्रल, हेरिटेज, मोर यापैकी कुठलीही भारतातील सर्वात यशस्वी रिटेल चेन नाही. आर्मी कॅंटीन भारतातील सर्वात यशस्वी रिटेल चेन आहे.

देशातील सर्वात यशस्वी रिटेल चेन म्हणून द कॅंटीन स्टोर्स डिपार्टमेंट म्हणजेच आर्मी कॅंटीन चालविणारे लष्कराचे खाते हे नावारुपाला आले आहे. आर्मी कॅंटीनला मागील वर्षभरात २३६ कोटी रुपयांचा नफा झाला. तर डी मार्ट चालविणाऱ्या अॅव्हेन्यू सुपरमार्टला २११ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. फ्युचर रिटेलला १५३ कोटींचा फायदा झाला तर रिलायन्स रिटेलला १५९ कोटी रुपयांचा फायदा झाला.

जवळपास ५,३०० उत्पादने आर्मी कॅंटीनमध्ये विकली जातात. आर्मी कॅंटीनचा लाभ सुमारे एक कोटी २० लाख ग्राहकांनी घेतला आहे. देशात जवळपास ३,९०१ कॅंटीन्स रिटेल स्टोर आहेत, ३४ डेपो आणि ६०० पुरवठादार आहेत. साबणापासून ते वाहनापर्यंत सर्व गोष्टी कॅंटीनमध्ये मिळतात. केवळ एक टक्का नफ्यावर चालणाऱ्या आर्मी कॅंटीनने घेतलेली ही झेप कौतुकास्पद असल्याचे मत लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment