पुढील महिन्यात स्पेक्ट्रम लिलाव

auction
नवी दिल्ली – पुढील महिन्यात २९ सप्टेंबर रोजी ‘मेगा स्पेक्ट्रम’चा लिलाव होणार असून यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने लिलावासाठी अर्ज मागविले असून नोटिसही जारी केली आहे. ७ बँड स्पेक्ट्रमचा लिलाव केंद्रीय दूरसंचार विभाग करणार असून एकूण २३५४.५५ मेगाहर्ट्झ बँडचा लिलाव होईल. आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्यावर ३० दिवसांनंतर स्पेक्ट्रमचे परवाने देण्यात येतील. केंद्रीय मंत्रिमंडळाने मेगा स्पेक्ट्रम लिलावासाठी मंजुरी दिली आहे. या लिलावातून सरकारी तिजोरीत 5.66 लाख कोटी रुपयांची भर पडणार असून जे दूरसंचार विभागाच्या एकूण उत्पन्नाच्या दुप्पट आहे.

Leave a Comment