गुगल सायन्स फेअरच्या फायनलमध्ये दोन भारतीय

google
वॉशिंग्टन – गुगल सायन्स फेअर २०१६च्या फायनलमध्ये दोन भारतीय युवकांनी स्थान मिळवले आहे. या दोन भारतीय युवकांसोबतच चार अमेरिकन विद्यार्थी देखील या सायन्स फेअर २०१६च्या फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. फायनलसाठी जगभरातील १६ प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनीच्या विजयी विद्यार्थ्याला ५० हजार डॉलर (३३.४८ लाख) रुपयांची स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. मागील सहा वर्षांपासून या सायन्स फेअरचे आयोजन करण्यात येत असून या प्रतियोगिते १३ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थी भाग घेऊ शकतात.

या सायन्स फेअरसाठी हैद्राबादच्या साधु वासवानी इंटरनेशनल स्कूलच्या फातिमा (१५)ची निवड स्वयंचलित पाणी व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी केली आहे. तर बंगळूरू येथील नॅशनल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी श्रीयांक (१५) याची देखील निवड करण्यात आली आहे. या दोघांव्यतिरिक्त भारतीय वंशाचे अमेरिकी विद्यार्थ्यांमध्ये अनिका चीर्ला (१४), अनुष्का (१३), निखिल गोपाल (१५) और निशिता बेलुर (१३) यांनी देखील फायनलमध्ये जागा मिळवली आहे.

Leave a Comment