न्यू जनरेशनची आय ३० लवकरच बाजारात येणार

i30
नवी दिल्ली : पॅरिस येथे सप्टेंबरमध्ये मोटार प्रदर्शन होणार असून यामध्ये भारताची प्रसिद्ध लोकप्रिय कार निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्स आपल्या ग्राहकांसाठी न्यू जनरेशनची आय ३० लवकरच लाँच करणार आहे. युरोपमध्ये या हॅचबॅक कारचे डिझाइन, डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग करण्यात आले आहे. या सिरीजमधील आत्तापर्यंत ही कार सर्वात उत्तम कारमधील ही कार असणार आहे. याबाबत कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य डिझायनिंग अधिकारी पीटर श्रेयर यांनी सांगितले, की ही नवी आय३० कार सर्व ग्राहकांसाठी उपयोगी असणार आहे. त्यामुळे ही कार ग्राहकांसाठी विशेष अशी असणार आहे.