नव्या रंगासह लाँच झाली ड्रीम युगा

dream-yuga
नवी दिल्ली : आपल्या ड्रीम युगा या दुचाकीचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी होंडा कंपनीने ड्रीम युगा सीरीजच्या दोन नव्या कलरच्या बाइक आपल्या ग्राहकांसाठी लाँच केल्या आहेत. ही नवी ड्रीम युगा बाइक ब्लॅक विथ एथलेटिक ब्लू मेटालिक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आली असून या बाइक्स ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाविना मिळणार आहे. या बाइकमध्ये ११० सीसीचे इंजिन, ४ स्ट्रोक एअर कुल्ड गिअर, ८.६३ न्यूटन मीटर टार्क, टय़ुबलेस टायर, एअर फिल्टर, दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment