आयफोनच्या आकाराचे ड्रोन

drone
चीनने जगातील सर्वात सडपातळ ड्रोन विकसित केले असून हे ड्रोन खिशातही सहज मावू शकते. ७५ ग्रॅम वजनाचे हे ड्रोन आक्टोबर २०१६ मध्ये बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे. लांगलोग असे या ड्रोन चे नामकरण केले गेले आहे. चीनच्या गुआंगडान प्रांतातील डोंगगुम मधल्या झेरोटेक या तंत्रज्ञान कंपनीने हे ड्रोन विकसित केले आहे.

या कंपनीचे सीईओ वांग झिलांग या संदर्भात माहिती देताना म्हणाले की हे ड्रोन फोल्ड करता येते व फोल्ड केल्यानंतर ते आयफोन सिक्स प्लस स्मार्टफोनच्या आकाराचे बनते. त्यामुळे ते सहज खिशात मावते. एकावेळी ते १२ मिनिटांपर्यंत हवेत उडू शकते व स्मार्टफोनच्या सहाय्याने ते नियंत्रित करता येते. या ड्रोन च्या सहाय्याने फिरणार्‍या व्हिडीओच्या सहाय्याने ७२० पिक्सल एचडी व्हिडीओ बनविता येणार आहेत.

Leave a Comment