म्यानमार ते प.बंगालपर्यंत गॅसपाईप लाईन होणार

gas
देशातील गॅसचा पुरवठा वाढावा व त्यातही ईशान्येकडील राज्यांना गॅस पुरवठा करणे अधिक सहज व्हावे यासाठी केंद्र सरकारने म्यानमारपासून ते प. बंगालपर्यंत गॅस पाईप लाईन टाकण्याची योजना आखली आहे. हायड्रोकार्बन व्हीजन २०३० अंतर्गत या योजनेखाली ६९०० किमीची गॅस पाईपलाईन म्यानमार, बांग्लादेश, ईशान्येकडील राज्ये व तेथून प.बंगाल अशी टाकली जाणार आहे. या पाईपलाईनसाठी भारत व बांग्ला देश सरकारांनी सहमती दर्शविली आहे.

या संदर्भात माहिती देताना ओएनजीसीचे कार्यकारी संचालक एस.सी. सोनी म्हणाले, ईशान्येकडील राज्यांना याचा अधिक लाभ मिळणार आहे. या भागातील ग्राहकांपर्यंत एलपीजी पोहोचविण्यात कांही कायदेशीर अडचणी आहेत. सरकारच्या कांही धोरणांमुळे ओएनजीसी व इंडियन ऑईल कंपनी छोट्या व दुर्गम गॅस फिल्डमधून येथे गॅस विक्री करू शकत नाही. पाईपलाईन मुळे ही समस्या सुटणार आहे. या संदर्भातील चर्चा पार पडल्या आहेत. बांग्ला देशाला हायस्पीड डिझेल पुरविण्यासाठी हायस्पीड डिझेल पाईपलाईनही टाकली जाणार असल्याचे सोनी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment