मोठ्या कर्जांची जबाबदारी बँकर्सनी घ्यावी: राजन

raghuram-rajan
मुंबई: मोठ्या कर्जदारांना कर्ज मंजूर करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली. समितीने कर्जासंबंधी निर्णय घेण्याऐवजी वरिष्ठ बँक अधिकाऱ्याने जबाबदारी घ्यावी आणि नियमित कर्जवसुली झाल्यास त्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कारही द्यावा; अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीयीकृत बँकांच्या वार्षिक संमेलनात राजन बोलत होते. कर्ज मंजुरीसाठी सध्या असलेली समितीची पद्धत कायम ठेवली तरीही त्या कर्जाची जबाबदारी एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली जावी. कर्जाच्या प्रस्तावावर त्या अधिकाऱ्याचे नाव नमूद करावे. ही जबाबदारी घेण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकारी आपल्यावर जबाबदारी असलेल्या कर्ज प्रकारांची कसोशीने तपासणी करतील. त्याची व्यवहार्यता तपासतील. त्याच्या वसुलीसाठीही सतर्क राहतील; असे राजन म्हणाले.

Leave a Comment