एका मिनिटात हार्ट अॅटेकचे निदान करणारा सेन्सर

heart
सोल- हदयविकाराचा झटका आला आहे काय याचे निदान १ मिनिटात व केवळ १ थेंब रक्ताच्या चाचणीतून करणारा सेन्सर द. कोरियातील वैज्ञानिकांनी तयार केला आहे. इलेक्ट्रीकल इम्यूनोसेन्सर असे या सेन्सरचे नाव आहे. उलसान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅड टेक्नॉलॉजीचे संशोधक जे सुंग जांग यांनी या संदर्भातील माहिती जाहीर केली आहे.

जगभरात आज बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार येण्याचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले आहे. कांही काळापूर्वी प्रौढ व्यक्तींना हा धोका जास्त होता मात्र आता अगदी तरूण वयातही हार्ट अॅटेक येऊ लागले आहेत. या आजारात वेळेवर निदान झाले नाही तर जीव गमावण्यची पाळी येते. हार्ट अॅटक येताच रक्तातील ट्रोपोनिन आय या रसायनाचे प्रमाण वाढते. नवीन विकसित केलेला सेन्सर ट्रोपोनिन आयचे प्रमाण मोजण्यास सक्षम आहे. रक्ताच्या १ थेंबातून या रसायनाची पातळी केवळ १ मिनिटात मोजता येते व त्यावरून हार्ट अॅटेकचे निदान करता येते. अत्यंत कमी वेळात ही तपासणी होत असल्याने उपचार त्वरीत सुरू करता येतात व रूग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment