स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल, मध्यरात्रीपासून लागू झाले नवे दर

petrol
नवी दिल्ली: पेट्रोल एक रुपयांनी तर डिझेल दोन रुपयांनी स्वस्त झाले असून काल मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाल्यामुळे आता नागरिकांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे. कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरल्यामुळे भारतातही पेट्रोल डिझेलच्या किमती घसरल्या आहेत. तेल कंपन्या दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेतात. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे असलेले दर आणि घरगुती (किरकोळ) पातळीवर असलेले तेलाचे दर यांबाबत चर्चा केली जाते. या आढाव्यानंतरच दरात कपात किंवा वाढ करण्याबाबत निर्णय़ घेण्यात येतो.

Leave a Comment