अब्जाधीश उद्योजक सारा अंर्तवस्त्र गुरू

sara
अंतर्वस्त्र उत्पादित करण्यात जगातील अनेक कंपन्या प्रसिद्ध आहेत. ई कॉमर्समुळे या कंपन्यांना आता जगभरात कुठेही त्यांचा माल पोहोचविता येणे शक्य झाले आहे मात्र अंडरवेअर गुरू किंवा अंतर्वस्त्र गुरू बनण्याची किमया एका तरूण उद्योजिकेने साध्य केली असून अल्पवयातच या उद्योगातून ही युवती अब्जाधीशांच्या रांकेत बसली आहे. सारा ब्लॅकली नावाची ही युवती अमेरिकेतील यंगेस्ट सेल्फमेड अब्जाधीश आहे. स्पॅक्स ब्रंडखाली ती केवळ महिलांसाठी अंतर्वस्त्रे डिझाईन करते व तिच्या ग्राहक यादीत अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यापासून ते हॉलीवूड हॉटी जेनेफर लोपेझ पर्यंत अनेक प्रसिद्ध महिलांचा समावेश आहे.

स्पॅक्स या ब्रँडनेमखाली डिझाईन केली जाणारी अंतर्वस्त्रे माहिलांना खास प्रसंगी वापरण्यायोग्य बनविली जातात. या कारखान्यात कामगार म्हणून बहुतेक महिलाच काम करतात आणि या गोष्टीचा अभिमान वाटतो असे सारा सांगते. हॉट नाईट आऊट, रेड कार्पेट साठी त्यांना फार मागणी आहे. साराच्या या उत्पादनांचा पुरवठा यूएई, श्रीलंका, पेरूसह ६० देशांना केला जातो. फोर्ब्सच्या जगातील १०० पॉवरफुल महिलात साराचे स्थान ९० वे असून तिची संपत्ती आहे १.०४ अब्ज डॉलर्स. हिलरी क्लिंटन यांनी आवर्जून साराच्या स्पॅक्स ब्रँडला त्यांची पंसती असल्याचे नमूद केले होते.

Leave a Comment