पहिला हॅकप्रूफ उपग्रह सोडण्याच्या तयारीत चीन

satte
जगातला पहिला हॅक होऊ न शकणारा क्वांटम उपग्रह प्रक्षेपित करण्याची तयारी करून चीनने अंतराळ विज्ञानात भरीव कामगिरीची नोंद केली आहे. हा उपग्रह हॅक करता येणार नाहीच पण त्याने पाठविलेली माहिती टॅप करणे अथवा खराब करणेही शक्य नसल्याचा दावा केला जात आहे. या उपग्रहाचे कार्य यशस्वी ठरले तर हॅकप्रूफ दळणवळण प्रणालीसाठीचा रस्ता खुला होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

जुलै २०१५ मध्ये चीनी विज्ञान अकादमी आणि इंटरनेट जायंट कंपनी अलीबाबा यांनी संयुकत सहकार्यातून शांघाय येथे क्वांटम प्रयोगशाळा सुरर केली आहे. २०३० पर्यंत या प्रयोगशाळेत ५० पेक्षा अधिक बीटवाला क्वांटम संगणक विकसित केला जाणार आहे. या संगणकाच्या सहाय्याने जगातील कोणतीही संगणक सिस्टीम हॅक करणे शक्य असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment