गोरेपणाच्या क्रिमसाठी डॉक्टर प्रिस्क्रीप्शन आवश्यक

cream
गोरेपणा देण्याचा दावा करणार्‍या व स्टेरॉईड तसेच एफडीसी असलेल्या क्रिमसाठी यापुढे डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक करण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे समजते. आरोग्य मंत्रालयाकडे या संदर्भात त्वचारोग तज्ञ असो.ने अनेकदा असल्या क्रिमवर नियंत्रण आणले जावे यासाठी अर्ज केले आहेत त्याची दखल घेऊन असल्या क्रिमचा बाजार नियंत्रित करण्यासाठी लवकरच आरोग्य मंत्रालय अध्यादेश जारी करणार असल्याचे समजते.

गोरेपणा देण्याचा दावा करणार्‍या क्रिम्सची बाजारपेठ दिवसेदिवस वाढते आहे. मात्र ज्या क्रिममध्ये स्टेरॉईड अथवा एफडीसीचा वापर केला जातो त्या क्रिमचे दुष्परिणाम मोठे होतात. अशी क्रिम वास्तविक औषध या श्रेणीत येतात व ती तज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याशिवायच वापरणे धोकादायक ठरू शकते. मात्र आजकाल ही सर्वच क्रिम कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय दुकानात विकली जातात. या क्रिम्समुळे अनेकदा चेहर्‍यावर फोड येणे, त्वचा पातळ होणे, चेहर्‍यावर केस येणे यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात व त्यामुळे त्यांच्या विक्रीवर नियंत्रण हवे असे त्वचारोग तज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment