पाकिस्तान स्वातंत्र्यादिनाला भारतात तयार केलेले झेंडे

flag
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनासाठी फडकविले जाणारे झेंडेही भारतातच तयार करून पाकिस्तानात पाठविले गेले आहेत. मुंबईतील फ्लॅग शॉप इंडिया गेली ३० वर्षे झेंडे बनविण्याच्या व्यवसायात आहे व भारत पाकिस्तानबरोबरच अन्य अनेक देशांचे झेंडे येथे शिवले जातात. पाकिस्तानलाही दरवर्षी १४ ऑगस्टपूर्वीच असे झेंडे तयार करून पाठविले जातात.

भारताचा उद्या ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना या कंपनीने १० हजार झेंडे ऑर्डरनुसार तयार केले आहेत. या कंपनीत तीन बाय चार ते साठ बाय ९० फूट अशा आकाराचे झेंडे बनतात. भारतीय लष्करी विभाग, सरकारी कार्यालये याच कंपनीतील झेंडे खरेदी करतात तर उच्चायुक्तांच्या बैठकीत टेबलावर लावले जाणारे संबंधित देशांचे झेंडेही ही कंपनी पुरविते.

कंपनीचे व्यवस्थापक मुकेश लोणकर सांगतात, आपल्या राष्ट्रध्वजाबाबत नागरिकांच्या भावना तीव्र असतात त्यामुळे झेंडे बनविताना अतिशय काळजी घ्यावी लागते. त्यांचा आकार, रंग याकडे विशेष लक्ष दिले जातेच पण पावित्र्यही राखले जाते. पॉलीस्टर व नायलॉनचा वापर करून बनविले जात असलेले हे झेंडे असतात. येथील कामगार कामाच्या ठिकाणी जाताता बूट, चप्पल घालत नाहीत कारण राष्ट्रध्वज बनविणे हे देवाच्या पुजेसारखेच पवित्र कार्य मानले जाते.लोणकर म्हणतात, भारत व पाकिस्तानातील परस्परसंबंध कसेही असले तरी पाकिस्तानी झेंड्यानाही अन्य देशांच्या ध्वजाप्रमाणेच आम्ही सन्मान देतो.

Leave a Comment