कोणत्याही हस्तलिखिताची कॉपी करणारे सॉफ्टवेअर

software
कोणत्याही प्रकारच्या हस्तलिखिताची सहीसही कॉपी करणारे सॉफ्टवेअर लंडन युनिव्हर्सिटी कॉलेज मधील संशोधकांनी विकसित केले आहे. वास्तविक असा प्रोग्रॅम पूर्वीही तयार केला गेला आहेच पण संशोधक टॉम हेन्सी यांच्या म्हणण्यानुसार आमचे सॉफ्टवेअर अगदी घाणेरडे, दुर्बोध व किचकट हस्तलिखित असेल तरीही त्याची कॉपी करते. माय टेक्स्ट इन युवर हँडयायटिंग असे या सॉफ्टवेअरचे नामकरण केले गेले आहे.

याच्या मदतीने ऐतिहासिक व्यक्तींच्या हस्तलिखिताची कॉपी करणे सहज सुलभ होत आहे. या प्रकारे अब्राहिम लिंकन, शेरलॉक होम्सचा निर्माता आर्थर कॉनन डॉयल यांची हस्ताक्षरे सहीसही कॉपी केली गेली आहेत.या तंत्रज्ञानाचा उपयोग बँकची संवेदनशील कागदपत्रे अधवा नवीन क्रेडीट कार्ड हाताने लिहून पाठवायचे असेल तर त्यासाठी होऊ शकणार आहे. त्यामुळे हा व्यवहार पर्सनल वाटू शकेल. तसेच जन्मदिवसाच्या शुभेच्छा, अभिनंदनपत्रे, धन्यवाद यासारख्या संदेशांनाही भावनिक रूप त्यामुळे देता येईल. यामुळे सही कॉपी करण्यासारखे धोके होऊ शकणार नाहीत कारण मायक्रोस्कोपखाली पाहिले गेले तर मानवी हस्ताक्षर व मशीनचे हस्ताक्षर यातील फरक त्वरीत लक्षात येतो असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment