भारतीय बुलेटप्रूफ जाकीट व हेल्मेट जगात सर्वोत्तम

jacket
क्षणात जीव घेऊ शकणार्‍या घातक बंदुकांची निर्मिती करणार्‍या मुठभर देशांच्या गोळ्यांपासून जीव वाचविण्याचे सर्वात उत्तम तंत्रज्ञान भारताकडे आहे कारण भारतात बनलेली बुलेटप्रूफ जाकीटे व हेल्मेट ही जगातील सर्वोत्तम क्वालिटीची आहेत हे आपल्याला माहिती आहे का?

भारतीय बुलेटप्रूफ जाकिटे व हेल्मेटला जगभरातून मोठी मागणी येत असून भारतासह १०० देशांत ती निर्यातही केली जात आहेत. यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स जर्मनी यासारख्या आधुनिक देशांचाही समावेश आहे. ही उत्पादने १०० हून अधिक देशांतील २३० प्रकारच्या सेनादलांसाठी निर्यात केली जात आहेत.

भारतीय जाकीट व हेल्मेटनी त्यांची उपयुक्तता सिद्ध केली आहे.कानपूर व फरिदाबाद येथे या उत्पादनांचे कारखाने आहेत व तेथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे. गृहमंत्रालयाने निमलष्करी जवानांसाठी १० लाख बुलेटप्रूफ हेल्मेटची ऑर्डर नोंदविली आहे. ही हेल्मेट केवळच चेहराच नाही तर मानेलाही पूर्ण संरक्षण देतात. २० मीटरवरून झाडली गेलेली गोळी झेलण्यातही ती यशस्वी ठरली आहेत. या क्षेत्रात खासगी कंपन्यांचा दबदबा असून फरीदाबाद येथे जॅकेट उत्पादक कंपन्यांचे मोठे हब निर्माण झाले आहे. अर्थात गेली कित्येक वर्ष या कारखान्यात उत्पादन सुरू आहे असेही समजते.

स्टार वायर कंपनी यात अग्रणी असून या कंपनीकडे सरकारची मोठी ऑर्डर आहे. अन्य कंपन्यांत इंडियन आर्मर सिस्टीम ही कंपनीही आघाडीवर आहे. येथे बनविल्या जात असलेल्या जॅकेटमध्ये सिरॅमिक व बॅलेस्टीक अशा दोन लेअरचा वापर केला जातो. त्यांच्या किंमती दर्जानुसार ३५ हजारांपासून २ लाख रूपयांपर्यंत आहेत.

Leave a Comment