यूएम मोटससायकल्सची रेनेगेड स्पोर्ट एस भारतात

renejd
अमेरिकन मोटस सायकल कंपनी यूएम ने भारतात पदार्पण केले आहे. त्यांनी त्यांच्या रेनेगेड व रेनेगेड स्पोर्ट एस या मोटरसायकली भारतात सादर केल्या आहेत. या मोटरसायकल्सनी पदापर्णातच भारतीयांची पसंती मिळविली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दोनी बाईकचे डिझाईन अत्यंत आकर्षक आहे.

रेनेगेड स्पोर्ट एस बाईकला ३६० डिग्री एलईडी लाईट सिस्टीम, ब्लाईंड स्पॉट मिररस व रेट्रो डिझाईन दिले गेले आहे. २७९.५ सीसीचे १ सिलींडर चार स्ट्रोक लिक्विड कूल्ड इंजिन सहा स्पीड ट्रान्समिशनने जोडले गेले आहे. इलेक्ट्रीक स्टार्ट सिस्टीम दिली गेली आहे. बाईकचे मागचे टायर ट्यूबसह तर पुढचे टायर ट्यूबलेस आहे. सस्पेन्शन व ब्रेकींग सिस्टीम उच्च दर्जाची आहे. टी शेप हँडलवर स्पोर्ट ग्रिप्स चालकाला आरामदायी रायडिंग पोझिशन देत आहेत. या बाईकची किंमत दिल्ली एक्स शो रूम १ लाख ७० हजार रूपये आहे.

Leave a Comment