१४९९च्या स्मार्टफोन सोबत वर्षभर इंटरनेट मोफत

datawind
मुंबई : सध्या स्मार्टफोन युजरची चलती असून इंटरनेट डेटासाठी रिलायन्स जिओने नवीन योजना जाहीर केली आहे. त्यामुळे अन्य कंपन्यांनी आपल्या इंटरनेटमध्ये मोठी कपात केली. आता १४९९च्या स्मार्टफोन सोबत डेटाविंड या कंपनीने वर्षभर मोफत इंटरनेट देण्याचे जाहीर केले आहे.

टॅबमध्ये जम बसविल्यानंतर आता डेटाविंडने स्मार्टफोनमध्ये उडी घेतली आहे. भारतात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी स्मार्टफोन लॉंच केला आहे. या कंपनीचा स्मार्टफोन चक्क १४९९ रुपयात मिळणार असून सोबत वर्षभर मोफत इंटरनेट डेटा मिळणार आहे. डेटाविंडच्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर चारणाऱ्या पॉकेटसर्फर जीझेडची किंमत केवळ १४९९ रुपये आहे. त्यांची रिलायन्सशी भागीदारी असल्याने ग्राहकांना एक वर्ष मोफत इंटरनेट सुविधा मिळणार आहे. तसेच डेटाविंडने चार स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. ज्यांची किंमत २४९९ ते ५९९९ रुपयांदरम्यान आहे.

Leave a Comment