ही महिला कमांडो होणार विशेष पोलीस अधिकारी; पण का?

police
रायपूर – छत्तीसगडच्या बलोद जिल्ह्यातील एक महिला कमांडोला आता विशेष पोलीस अधिकाऱ्याचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे ही महिला आता दारूबंदी आणि समाजातील वाईट कामांना अटकाव करण्याचे काम करणार आहे. दरम्यान २००६मध्ये सामाजिक कार्यकर्ते शमशाद बेगम यांनी आपल्या गुंडरदेही या गावी स्वखर्चातून महिला कमांडो या समुहाची स्थापना केली. या समुहाने या क्षेत्रातील दारू आणि अन्य समाजातील वाईट कामांचा नायनाट करण्याचा विडा उचलला आहे. आज या समुहातील जवळपास ८ हजार महिलांनी दारू माफियां विरोधात यल्गार पुकारले आहे.

५२ वर्षीय बेगम यांना २०१२मध्ये भारत सरकारने महिलांच्या शिक्षा, दलितांचा विकास आणि अन्य सामाजिक कार्यांसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. बेगम सांगतात की महिला कमांडोमध्ये सामील झालेल्या महिलांनी दारूमुळे होणारे दुष्परिणाम झेलले आहेत आणि आता येणारी पिढी या दारूपासून दूर रहावी आणि दारूबंदीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

Leave a Comment