निसानची सुपर इलेक्ट्रिक ब्लेड ग्लायडर लाँच

nissan
नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांसाठी सुपर इलेक्ट्रिक वाहनाच्या प्रोटोटाइप प्रकारातील जपानी ऑटो जॉइंट कंपनी निसानने ब्लेड ग्लायडर कार लाँच केली असून या इलेक्ट्रिक कारमध्ये एरोडायनॅमिक्स आणि स्टाइल कॉम्बिनेशन आहे.

ग्राहकांना ही नवी कार नक्कीच आवडेल आणि या कारचे विशेषता महत्त्वपूर्ण असे फिचर्स देण्यात आले आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहेत. या कारचे स्टिअरिंग व्हिल हाती घेतल्यानंतर वाहनचालकाला कॉकपिटचा अनुभव घेता येणार आहे. या कारच्या फ्रंट व्ही-शेप्डचे हेडलाइट देण्यात आले आहेत. ब्लेड ग्लायडर कारमधील चाकांसाठी इन-व्हिल इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे. या कारमध्ये ७०७ एन.एम. टार्क निर्माण करु शकतो. ही कार २६८ बीएचपीच्या शक्ती निर्माण करु शकते. या कारचा स्पीड ५ सेकंदामध्ये ० ते १०० किमी. असणार आहे.

Leave a Comment