कारमधील पेट्रोलचा अंदाज घ्या अॅपच्या माध्यमातून

bmw
नवी दिल्ली : कारमधील पेट्रोलची क्षमता किती आहे हे अॅमेझॉनच्या इको डिव्हाइसच्या माध्यमातून समजू शकणार आहे. हे अॅप कार्यान्वित करण्यासाठी बीएमडब्ल्यू कार असणे गरजेचे आहे. याच बरोबर ही कार घरी बसल्या बसल्या लॉकदेखील करता येऊ शकते.

बीएमडब्लू कनेक्टिव्हिटी अॅपची हे सर्व समजण्यासाठी गरज भासते. हे अॅप सध्या वाहनमालकांना आयओएसवर उपलब्ध होणार असून त्यानंतर हे अॅप अँड्राइडवर उपलब्ध करण्यात येणार आहे. या नव्या फिचर्सची सुरुवात सप्टेंबर महिन्यापासून होणार आहे. तसेच या अॅपच्या माध्यमातून कॅलेंडर आणि मॅप्स् देण्यात आले आहे. तसेच इच्छित प्रवासासाठी किती कालावधी लागेल हे देखील या अॅपच्या माध्यमातून समजणार असल्यामुळे वाहनचालकांसाठी हे अॅप विशेष असे ठरणार आहे.