ट्रेनला कंपन्या देऊ शकणार आवडीचे नांव

rail
रेल्वेला भाड्यातून होत असलेल्या उत्पन्नाव्यतिरिक्त अधिक उत्पन्न मिळण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून खासगी कंपन्या, उद्योग रेल्वेत गुंतवणूक करून त्यांच्या कंपनीचे नांव ट्रेनला देऊ शकणार आहेत. सध्या तिकीटाव्यतिरिक्त अन्य कमाईतून रेल्वेला ३०० कोटी रूपये मिळतात. हा आकडा १५०० कोटींपर्यंत नेण्यासाठी विविध योजना आखल्या जात असून त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे.

या योजनेचा एक भाग म्हणून देशातील २१७५ रेल्वेस्थानकांवर २ लाखांपेक्षा अधिक मल्टीपरपज डिजिटल स्क्रीन लावले जात आहेत. येत्या सहा वर्षात त्यातून ३५०० कोटींपर्यंत उत्पन्न मिळेल असा अंदाज रेल्वेच्या विशेष समितीचे कार्यकारी संचालक राजन ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, अर्धे डिजिटल डिस्प्ले रेल्वे संदर्भातल्या सूचना दाखवितील तर अन्य डिस्प्ले जाहिराती दाखवतील. यातून खासगी कंपन्या अथवा उद्योग ट्रेन ब्रँडींगही करू शकणार आहेत. म्हणजे या कंपन्यांनी रेल्वेत गुंतवणूक करून त्यांच्या जाहिराती द्यायच्या व त्यांचे नांव संबंधित गाडीला दिले जाईल. कोणते नांव रेल्वेला द्यायचे याचा पूर्ण अधिकार संबंधित कंपनीकडे असेल.

मनोरंजन, वायफाय, प्रवाशांसाठी उपयुक्त सामान विक्री अशी सुविधाही कंपन्यांना दिली जाणार आहे.यात स्टेशनवर रेडिओ लॉचिंग, वेबसाईट, प्रॉडक्ट प्रदर्शन करण्याची सुविधा मिळणार आहे.

Leave a Comment