नवी दिल्ली – लँडलाईनच्या व्यवसाय वाढीसाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या कंपनीने १५ ऑगस्ट २०१६ रोजी पूर्ण दिवस फ्री कॉलिंग स्कीमची घोषणा केली आहे. बीएसएनएलच्या लँडलाईनवरून यादिवशी तुम्ही कोणत्याही नेटवर्कचा मोबाईल आणि लँडलाईनवर अगदी मोफत कॉल करू शकणार आहात.
बीएसएनएल ग्राहकांना स्वातंत्र्य दिनादिवशी देणार गिफ्ट
प्रत्येक नेटवर्कवर सध्या फ्री कॉलींग सुविधा फक्त रात्रीची (रात्री ९ ते सकाळी ७ वा.) राबविली जाते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएलीची ही स्कीम वेगळी आहे. या दिवशी तुम्ही भारतातील कोणत्याही नेटवर्कच्या मोबाईलवर, तसेच लँडलाईनवर मोफत कॉल करू शकता. मागील वर्षी बीएसएनएलने नाईट फ्री कॉलिंग सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.