नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांसाठी नवे स्मार्टवॉच प्रसिद्ध घडय़ाळ निर्माता कंपनी टायटनने लाँच केले आहे. टायटन जस्ट प्रो हे नवे स्मार्टवॉच लाँच केले आहे. हे वॉच ई-कॉमर्स वेबसाइटवरुन खरेदी करता येऊ शकते. हे स्मार्टवॉच सिल्व्हर आणि ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
टायटनने लाँच केले नवे स्मार्टवॉच
या स्मार्टवॉचमध्ये १.३ इंचाचा डिस्प्ले, गोरिल्ला ग्लास, एक्सिलरोमीटर, गायरो आणि व्हायब्रेशन सेंसर, १ GHz डय़ुअल कोर प्रोसेसर, ५१२ एमबी रॅम, ४ जीबीची इंटरनल स्टोरेज त्याचबरोबर ब्लूटूथ ४.०, फोन फायंडर, स्टॉपवॉच, कॅमेरा, म्युझिक कंट्रोल ऑप्शन असे इतर फिचर्स देखील देण्यात आले आहे. या स्मार्टवॉचच्या माध्यमातून अँड्राइड ४.४ आणि आय.ओ.एस. ८ पेक्षाही अधिक अटॅच करता येऊ शकते. आपल्या मूड आणि स्टाइलनुसार याचा वापर करता येऊ शकतो. हे स्मार्टवॉच वॉटर रेसिस्टंट देखील आहे.