अल्काटेलचा दोन हजार रुपयांत ४जी स्मार्टफोन

alcatel
मुंबई : हल्ली अधिकाधिक कंपन्यांचा ग्राहकांना स्वस्तात मस्त स्मार्टफोन देण्याकडे कल असतो. त्यातच चिनी कंपनी अल्काटेलने नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीने सामान्या माणसाच्या खिशाला परवडेल अशीच किंमत या स्मार्टफोनची ठेवली आहे. अल्काटेलचा स्ट्रीक या स्मार्टफोनची किंमत केवळ २९.९९ डॉलर्स म्हणजे २००५ रूपये इतकी ठेवली आहे.

या स्मार्टफोनची सध्या केवळ अमेरिकेत विक्री सुरु आहे. दरम्यान, लवकरच हा स्मार्टफोन अन्य देशात दाखल होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ६.० मार्शमेलो ओएस, १ जीबी रॅम, ४.५ इंचाचा डिस्प्ले, ८ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ५ एमपी फोकस रेयर कॅमेरा तर २ एमपीचा फ्रंट कॅमेरा या सुविधा आहेत.

Leave a Comment