एक लाखाची दुर्मिळ नोट पाहिलीत?

note
नेताजी सुभाषचंद्र बोस व राष्ट्रपिता म.गांधी यांच्या प्रतिमा असलेल्या दुर्लभ नोटा नुकत्याच उजेडात आल्या आहेत. सुभाषचंद्रांची प्रतिमा असलेली नोट चक्क १ लाख रूपये मूल्याची आहे. या नोटा आझाद हिंद फौजेच्या काळातल्या असून त्या वेळच्या सर्व नोटांवर आजाझ हिंद बँक, बँक ऑफ इंडिपेन्डन्सी असा मजकूर आहे.१९४४ साली या नोटा जारी केल्या गेल्या होत्या व त्याचा पाया नेताजींनी घातला होता.

अर्थात नेताजींची संबंधित अशी ही पहिलीच नोट नाही. यापूर्वीही १ हजार रूपये मूल्याची तसेच १०० रूपये मूल्याची नेताजींची प्रतिमा असलेली नोट मिळाली आहे. या नोटा इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. मात्र १ लाख रूपये मूल्याची नोट प्रथमच सापडली आहे. माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष महेश डांवर यांच्या संग्रहात या दोन दुर्मिळ नोटा सापडल्या आहेत. पैकी एक १ लाख मूल्याची तर दुसरी १ हजार रूपये मूल्याची आहे. डांवर यांच्या मते फार पूर्वीपासून या नोटा त्यांच्या वाडवडीलांनी संग्रही ठेवल्या आहेत. पैकी १ लाख रूपयाची नोट फारच जीर्ण असून कांही ठिकाणी तिचे तुकडे पडलेले आहेत.

Leave a Comment