आता स्नॅपडीलचा विश फॉर इंडिया सेल

snapdeal
नवी दिल्ली: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवर स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने ऑफर्सचा पाऊस पडत असून अ‍ॅमेझॉनवर सुरू करण्यात आलेल्या ग्रेट इंडियन सेलनंतर आता स्नॅपडीलने सेल सुरू केला आहे. अ‍ॅमेझॉनच्या सेलची मोठ्या प्रमाणात जाहीरात करण्यात आली, पण स्नॅपडीलने इतकी जाहीरात केली नाही. मात्र, या साईटवरही ग्राहकांना विविध वस्तूंवर मोठी सूट देण्यात येत आहे.

तुमचा स्नॅपडीलने सुरू केलेल्या सेलमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. या सेलमध्ये कितीतरी मोबाईल फोन्सवर मोठी सूट दिली जात आअहे. स्नॅपडीलवरून जर तुम्ही सॅमसंग गॅलक्सी जे ३ खरेदी केला तर साधारण ७०० रूपयांचा फायदा होणार आहे. जर तुम्ही अ‍ॅसूस जेनफोन लेझर २ हा फोन ८४९९ रूपयात मिळत आहे. तसेच स्नॅपडीलच्या ऑफरमध्ये माईक्रोमॅक्स यूनाइट ४ प्रो हा फोन केवळ ६९९९ रूपयांना विकला जात आहे. तर लेनोव्हा ए१०००ची किंमत ३ हजार ७९९ रूपये इतकी देण्यात आली आहे. तसेच इंटेक्स क्लाऊड ब्रीज तुम्ही ३४९९ रूपयांमध्ये घरी नेऊ शकता. स्नॅपडील सेलमध्ये हार्डड्राईव्ह, कॅमेरा, लॅपटॉप आणि एलसीडी टीव्ही यांच्यावरही मोठी सूट देण्यात आली आहे.

स्वतंत्रता दिवसाच्या निमित्ताने ऑनलाईन सेलसोबत कित्येक ब्रॅन्डवर बंपर सेलची घोषणा करण्यात आली आहे. बिग बाजार, रिलायंसमध्येही मोठे सेल आहेत. या सेलमधून ग्राहकांची चांदीच चांदी होणार असे एक चित्र आहे. या सेलचा जास्तीत जास्त फायदा ग्राहकांनी घेतला तर त्यांचाच फायदा आहे कारण अनेक वस्तूंवर मोठी सूट देण्यात आली आहे.

Leave a Comment