सॅमसंगच्या ‘गॅलेक्सी नोट ७’ने तोडले बुकिंगचे सर्व विक्रम !

samsung
मुंबई : आतापर्यंतचे सर्व विक्रम गेल्या आठवड्यात लॉन्च झालेला सॅमसंगचा जबरदस्त फ्लॅगशिप ‘गॅलेक्सी नोट ७’ स्मार्टफोनने मोडीत काढले आहेत. कोरियन हेरॉल्डच्या वृत्तानुसार, तब्बल २ लाख ग्राहकांनी दोन दिवसात स्मार्टफोनसाठी पूर्वनोंदणी केली आहे. विशेष म्हणजे ही संख्या स्मार्टफोन ‘गॅलेक्सी एस७’च्या पूर्वनोंदणीपेक्षा जवळपास दुप्पट असल्यामुळे ‘गॅलेक्सी नोट ७’ स्मार्टफोनची ग्राहकांमधील उत्सुकता मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते आहे. निवडक देशांमध्येच सॅमसंगने गॅलेक्सी फ्लॅगशिप लॉन्च केले आहेत. भारतात गॅलेक्सी नोट ७ स्मार्टफोन ११ ऑगस्टला लॉन्च होणार आहे.

Leave a Comment