बिना इंधन धावणारी ट्राम

tram
प्रदूषण व इंधनाचे संपत येत असलेले साठे लक्षात घेऊन बिना इंधन धावू शकणार्‍या वाहनांवर जगभर संशोधन सुरू असतानाच चीनने संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची सुपरकपॅसिटर ट्राम तयार केली असून ही ट्राम विनाइंधन धावणार आहे. अर्थात ही ट्राम चार्ज करावी लागते मात्र ती फक्त ३० सेकंदात चार्ज होते. चीनच्या हुआन प्रांतात या ट्रामचे नुकतेच अनावरण केले गेले.

या ट्राम मधून एकावेळी ३८० प्रवासी प्रवास करू शकतात. तासाला या ट्रामचा वेग आहे ७० किमी. लहान मुले, गर्भवती महिला अथवा वृद्ध नागरिक यांना चढणे उतरणे सोपे जावे म्हणून या ट्रामचे लो फ्लोअर डिझाईन केले गेले आहे. झूइू इलेक्ट्रीकल लोकोमोटिव्ह कंपनीचे प्रमुख इंजिनिअर सुओ जियांगुओ म्हणाले की ट्रामच्या सर्व सुट्या भागांसह प्रत्येक वस्तू स्वदेशी असलेले हे चीनमधले पहिलेच वाहन आहे. ही ट्राम उर्जेवर चालते आणि त्यासाठी तारा वायरी यांची गरज नाही. ३० सेकंदात ती पूर्ण चार्ज होते व एकदा चार्ज झाली की ३ ते ५ किमीचा प्रवास करू शकते. त्यानंतर अर्धा सेकंदात पुन्हा चार्ज करून ती पुढचा प्रवास करते.

Leave a Comment