जादूटोण्याचा जगातला मोठा बाजार

mexico
अंधश्रद्धा व जादूटोणा ही फक्त भारताचीच मक्तेदारी नाही तर जगाच्या विविध भागात असले प्रकार आजही सर्रास वापरले जातात. अर्थात जादूटोणा करण्यासाठी लागणारे सामान खुलेपणाने कुठे विकले जात असेल असे आपल्याला वाटत नाही. अमेरिकन देश मेक्सिको मध्ये जगातील सर्वात मोठा जादूटोणा बाजार आहे हे कदाचित आपल्याला माहिती नसेल. आपल्याला मेक्सिको म्हटले की ड्रग्ज व ड्रग्ज माफिया चटकन आठवतात पण जादूटोणा बाजार हेही मेक्सिकोचे खास वैशिष्ठ आहे.

या बाजाराचे नावच मुळी सोनोरा विचक्राफ्ट मार्केट असून हा सुपरबाजार आहे. १९५० मध्ये सुरू झालेला व अशा प्रकारच्या वस्तू विकणारा हा एकमेव बाजार आहे. यात जादूटोणा, तंत्रमंत्र करण्यासाठी लागणारे सर्व सामान एकाच जागी मिळते. त्यामुळे हा बाजार जगात प्रसिद्ध आहे. पर्यटकांसाठी हा हॉटस्पॉट आहे व दररोज हजारो पर्यटक हा बाजार पाहण्यासाठी येथे येत असतात.

या बाजारात जादूटेाण्याच्या सामानासह हर्बल मेडिसिनही मिळतात. प्रत्येक दुकानात एक वैदू असतो व तो डॉक्टर कमी आणि जादूगारच जास्त असतो. येथे प्रत्येक समस्येवर उपाय सांगितला जातो. कायद्याने विक्रीला बंदी असलेल्या अनेक वस्तू येथे सहज मिळतात. त्यात दुर्मिळ प्राचीन प्राण्यांची कातडी, मानवी कवट्या, प्राण्यांची नखे, शिंगे, दात, रक्त तसेच जिवंत प्राणीही मिळतात. येथे सर्वात अधिक मागणी असलेला आयटेम म्हणजे वाळलेले हमिंग बर्ड. मग काय द्यायची या बाजाराला भेट?

Leave a Comment