अवघ्या दोन हजारात फोर जी स्मार्टफोन

akkarel
स्मार्टफोन बाजारात दररोज नवीन मॉडेल्स दाखल होत असतानाच अतिवेगवान फोरजी सेवा देणारे स्मार्टफोन चिनी कंपनी अल्काटेलने बाजारात आणले आहेत. सध्या फक्त अमेरिकेत विकले जात असलेले हे स्मार्टफोन अवघ्या दोन हजार रूपयांत मिळत आहेत. या नव्या स्मार्टफोनचे नामकरण स्ट्रीक असे केले गेले आहे. अमेरिकेत या फोनची किंमत आहे २९.९९ डॉलर्स म्हणजे २००५ रूपये. अमेरिकेपाठोपाठ अन्य देशांतही स्ट्रीक लवकरच दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

या फोनला अँड्राईड ६.० मार्शमेलो ओएस, १ जीबी रॅम, ४.५ इंची डिस्प्ले, अॅड्रीनो ३०४ जीपीयू, ८ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ५ एमपीचा फिक्स्ड फोकस रियर कॅमेरा तर २ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी फिचर्स दिली गेली आहेत.

Leave a Comment