दोन देशांच्या सीमेवरचे अनोखे हॉटेल

hotel1
प्रवासानिमित्ताने अथवा अन्य कांही कारणाने हॉटेलमध्ये निवासाची वेळ अनेकांवर येत असते. हॉटेल बुक करताना तेथे कोणत्या सुविधा दिल्या जातात याची माहितीही दिली जाते. कोणत्याच हॉटेलात तुम्हाला कोणत्या देशात झोपायला आवडेल असे मात्र विचारले जात नाही. पण आहे, यालाही एक अपवाद आहे. हॉटेल अरबेज फ्रांसको सुसी या नावाच्या हॉटेलात तुम्हाला हा प्रश्न हमखास विचारला जातो. कारण हे हॉटेलच मुळी फ्रान्स व स्वित्झर्लंडच्या सीमेवर आहे. व दोन देशांनी ते आपसात वाटून घेतले आहे.

hotel
या हॉटेलची विभागणी बरोबर दोन भागात केली गेली आहे मात्र तरीही कांही खोल्यांमध्ये ग्राहकाचे डोके फ्रान्समध्ये तर पाय स्वित्झर्लंडमध्ये अशी परिस्थिती होते. यात आणखी एक गोची अशी आहे की हॉटेल्सच्या रूम्स जास्त प्रमाणात स्वित्झर्लंडच्या हद्दीत आहेत तर फ्रान्सच्या हद्दीत जादा वॉशरूम्स आहेत. डायनिंग हॉल मात्र बरोबर विभागला आहे.

दोन्ही देशांच्या संस्कृतींची झलक येथे पाहायला मिळते. १८६२ साली फ्रान्स स्वित्झर्लंड कॉन्फेगरेशन मध्ये असलेला सीमा वाद संपुष्टात आला तेव्हा ला क्योर गाव दोन भागात वाटले गेले. तेव्हा या ऐतिहासिक जागेवर व्यवसाय सुरू करावा अशी कल्पना एका व्यावसायिकाला सुचली व त्याने येथे किराणा मालाचे दुकान सुरू केले. नंतर ही जागा १९२१ मध्ये पॉन्थस यांनी विकत घेऊन तेथे हे अनोखे हॉटेल सुरू केले असे सांगतात.

Leave a Comment